PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 28, 2024   

PostImage

मराठ्यांनी काय केलं ? ओबीसींचा नुकसान करून,ब्राह्मणांना बळ दिलय !


मराठा समाजाने आंदोलन करून सरकारला आरक्षण द्यायला भाग पाडले, हे जरी सत्य असेल.पण मराठा समाजाने समस्त ओबीसी समाजाच नुकसान केलं आणि ओपन मध्ये स्वतः नष्ट होऊन ब्राह्मण समाजाना बळ दिलय.

मराठा मराठा समाजाने जो आंदोलन उभं केलं तो खरोखर व्याखान्या जोग होता.आंदोलन असंच व्हायला पाहिजे मग तो कोणत्याही समाजाचा असो, म्हणजे सरकार वाटणीवर यायला पाहिजे.परंतु मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला पाहिजे तसं काहीच मिळालं नाही. डोंगर पोखरून उंदीर काढणे,अशी मराठ्यांची गत झाली.

मराठा समाजाच्या आंदोलनामुळे सर्वात जास्त नुकसान मराठा समाजाचा झालं कारण १०% टक्के EWS चे आरक्षण मिळत होते. सरकारी आकड्यांप्रमाणे EWS मध्ये आरक्षण घेणारे ८५% टक्के मराठा जातीचे होते,ते आरक्षणा आता मिळणार नाही,हा पहिला मुद्दा आहे. 

मराठा आंदोलनामुळे सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडल्या गेल्या,हे जरी सत्य असेल,तरी पण यामध्ये ओबीसी समाजाचा फार मोठे नुकसान झाला आहे.मराठा समाज विजयाचा खूप मोठा गाजावाजा करीत आहे,परंतु विजयी होऊन मिळालं काय ? १७% ओबीसी मधून आरक्षण तेही 363 जातींच्या उमेदवारांशी स्पर्धा करून. यात मात्र मूळच्या ओबीसी समाजाचा वाटा कमी होईल.

हम तो डुबेंगे सनम तुमको भी ले डूबेंगे, यात मराठा समाजाचा खूप मोठा नुकसान झालंच आहे पण यामध्ये ओबीसी समाजाचा ही खूप मोठं नुकसान करून ठेवलं.म्हणजे मराठीत एक म्हण आहे,गव्हा सोबत सोंड्याची पीसाई,याप्रमाणे ओबीसी समाजाचे नुकसान करून ठेवलंय.

आणखी वाचा : सगे सोयरे संपत्तीचे लोकं 

मराठा समाज आज आनंद उत्सव साजरा करीत असेल पण खरा आनंद उत्सव ब्राह्मण,सिंधी,जैन आणि मारवाडी समाजाने साजरा करणे आवश्यक आहे.कारण त्यांच्या 48% खुल्या जागांमध्ये संख्येने ५ ते ७ टक्के असलेले तेच शिल्लक राहिले.संख्येने 40% असलेले मराठी पूर्णपणे बाद झाले.म्हणजे कायमचे बाहेर फेकल्या गेले,हे मराठा समाजाने आधी समजून घेणे गरजेचे आहे.

याला म्हणतात ब्राह्मणाचे डोकं,हजारो वर्षांपासून आपल्या देशावर राज्य करीत आहे,हे समजून घेणे खूप महत्त्वाचा विषय आहे आणि त्यांच्या संख्येचे सुद्धा भान ठेवा.अल्पविद्या परी गर्व शिरोमणी अन मज हून ज्ञानी कोण आहे,अशी आपली पद्धत आहे.